Monday, February 24, 2025
Homeनोकरीनापास झालेल्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, आयटीआय प्रवेशासाठी 11 सप्टेंबरपर्यंत करु शकतात...

नापास झालेल्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, आयटीआय प्रवेशासाठी 11 सप्टेंबरपर्यंत करु शकतात अर्ज!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण झालेले आणि आत्तापर्यंत दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय (ITI) प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेत हे विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश (ITI Admission 2022) घेऊ शकतात.



आयटीआय (ITI) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना म्हणजेच 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठीचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2022 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश फेरीचेही वेळापत्रक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे अद्ययावत प्रवेश वेळापत्रक संकेतस्थळावर आणि सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना एसएमएसद्वारे वेळोवेळी अपडेट देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट द्यावे, असे आवाहन संचालनालयाने केले आहे.

नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाने नव्याने संलग्नता प्रदान केलेल्या तुकड्यांचा समावेश सद्यःस्थितीत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आयटीआयनिहाय रिक्त जागांचा तपशील अभ्यासावा, त्याप्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत सहभाग घ्यावा, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी सांगितली आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक :
– नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे, अर्जात दुरुस्ती करणे – 7 ते 11 सप्टेंबर 2022

– संस्थास्तरीय समुपदेशन फेरीतंर्गत सर्व शासकीय आणि खासगी संस्थांमधील रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे : 11 सप्टेंबर 2022

उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविणे – 12 सप्टेंबर 2022

– प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत उमेदवारांनी संबंधित आयटीआयमध्ये व्यक्तीश: हजर राहून समुपदेशन फेरीकरिता हजेरी नोंदवावी : 13 ते 17 सप्टेंबर 2022

– संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबंधित संस्थेत त्याचदिवशी प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावी. उमेदवारांनी त्याचदिवशी प्रवेश निश्चित न केल्यास त्या जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल : 13 ते 17 सप्टेंबर 2022

– प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी :https://admission.dvet.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -