Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रगणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी राजकीय नेते आणि सेलिब्रेटींचा पुढाकार!

गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी राजकीय नेते आणि सेलिब्रेटींचा पुढाकार!



दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर शुक्रवारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पण गणपती विसर्जनानंतर आज मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर अतिशय भयानक चित्र पाहायला मिळत आहे. कचरा, निर्माल्य आणि अर्धवट विसर्जित झालेल्या बाप्पाच्या मूर्ती किनाऱ्यावर आल्या आहेत. गणेश विसर्जनानंतर (Ganesh Immersion) आता मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते धावून आले आहेत. सकाळपासून मुंबईच्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम सुरु आहे.

मुंबईतल्या दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू येथे समुद्रकिनारा स्वच्छ अभियान राबवले आहे. या मोहिमेत राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह भाजप नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर दुसरीकडे मनसेतर्फे देखील समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -