Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरइराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तीचा समावेश

इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तीचा समावेश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : उपनगरासह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावपरिसरातील इराणी खण व त्या शेजारील दुसऱ्या खणीत शुक्रवारी (दि.०९) पासून शनिवारी दुपारपर्यंत १०८३ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. हे विसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.



इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली. त्यानंतर शिवसृष्टी मंडळ, वटवृक्ष कॉलनी, ब्लड ग्रुप, नापस्टार तरूण मंडळ, अमर तरूण मंडळ, कात्यायानी कॉम्प्लेक्स, जय शिवराय तरूण मंडळ, स्वयंभू गणेश मंडळ, जोतीबा रोड फुलवाले मित्र मंडळ, शिवालय तस मंडळ, विवेकानंद मित्र मंडळ, डी बॉईज मित्र मंडळ, | मनिषानगर मित्र मंडळ, फ्रेंडस मित्र मंडळ, शिवराज मंडळ , फायटर ग्रुप यांचा पहिल्या टप्प्यात विसर्जन झाले. त्यानंतर पर्यायी मार्गाने गणेश विसर्जना सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत २१ गणेशांचे विसर्जन झाले. त्यानंतर पर्यायी मार्गावरून येणाऱ्या गणेशांचा मोठा ओघ सुरु झाला. तत्पुर्वी सतेज पाटील फौंडेशन व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यामार्फत मानाचे श्रीफळ देण्यात आले. पंधरा ते २१ फुटी गणेशमूर्तीचेही विसर्जन झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -