बॉलिवूड आणि टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. लग्न झाल्यापासून अंकिता लोखंडे सोशल मीडियावर पती विकी जैनसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यामाध्यमातून ती सर्वांची मनं जिंकते खरं पण आता तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे. नुकताच अंकिताने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती देवाची पूजा करताना दिसत आहे. पण या पूजेवेळी तिने असे काही कृत्य केले आहे त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘देवा आशीर्वाद दे’. अंकिताने इन्स्टावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती देवाची पूजा करण्यासाठी पती विकी जैनसोबत मंदिरात आल्याचे दिसत आहे. यावेळी अंकिताने लाल रंगाची साडी नेसलेली आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी घातलेली दिसत आहे. तर तिचा पती विकी जैनही पूजा करताना परिधान केला जाणाऱ्या पारंपारिक पोशाखामध्ये दिसत आहे. दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. पण पूजेच्या वेळी अंकिता असे काही कृती करताना दिसत आहे जे नेटिझन्सला अजिबात आवडले नाही. तिचे काही चाहते तिचे कौतुक करत आहेत. पण अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
पूजा करताना केलेल्या या कृत्यामुळे Ankita Lokhande ट्रोल, संतप्त नेटकरी म्हणाले – ‘देवाचा आदर करा…’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -