ताजी बातमी ऑनलाईन टीम
शनिवारी सकाळ पासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर पाणी पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजता 300 क्यूसेक वरून 1000 करण्यात आला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने रात्री साडे आठ वाजता 1400 क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून भोगावती नदी पात्रात 1400 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे, दरम्यान जलसंपदा विभागाने नदी काठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, १४०० क्यूसेकने विसर्ग सुरू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -