Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रगणपती मिरवणुकीनंतर शिवसेना- शिंदे गटात राडा, 25 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल तर 5...

गणपती मिरवणुकीनंतर शिवसेना- शिंदे गटात राडा, 25 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल तर 5 जणांना अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये गणपती मिरवणुकीदरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर मध्यरात्री राड्यामध्ये झाले. शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलिस ठाण्याच्या परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गोळीबार केला असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. या संपूर्ण घटनेनंतर आता दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

शिंदे गटातील संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलिस ठाण्यात शिवसेना गटाच्या 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना अटक केली आहे. पण पोलिसांनी आमची बाजू ऐकली नसल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

तेलवणे यांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जनाच्या दरम्यान प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत यांनी देखील स्टॉल लावला होता. विसर्जनाच्या रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटामध्ये वाद झाला पण त्यावेळी तो मिटवला. शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सअॅपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना मारहाण केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -