बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमी या नाही तर त्या कारणांमुळे चर्चेत असते. टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतसोबतच्या अफेरमुळे ती काही दिवसांपूर्वी चांगलीच चर्चेत आली होती. पण आता उर्वशीचे नाव पाकिस्तानचा स्टार खेळाडू नसीम शाहसोबत जोडले जात आहे. उर्वशी रौतेला आणि नसीम शाह यांच्या अफेअरच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
उर्वशीने आशिया कप 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावली होती. तिने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नसीम शाह देखील दिसत होता. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता यावरुन उर्वशीला ट्रोल देखील करण्यात आले होते. पण यानंतर तिच्या आणि नसीमच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला. अशामध्ये नसीम शाहला उर्वशीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्याने जबरदस्त उत्तर देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले आहे.
Urvashi Rautela आणि Naseem Shah च्या अफेअरच्या चर्चा, क्रिकेटर म्हणाला – ‘कोण आहे उर्वशी?’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -