Tuesday, May 21, 2024
Homenewsपत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या ; एक महिन्यानंतर हा प्रकार...

पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या ; एक महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस


पत्नीच्या आणि सासू-सासऱ्यांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत. मागील महिनाभरात पुन्हा अशा प्रकारच्या तीन घटना उघडकीस आले आहेत. चतु:शृंगी पोलीस ठाणे आणि सहकारनगर पोलिस ठाण्यात नवऱ्याने पत्नी आणि सासू-सासरे यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्या आहेत.असाच आणखी एक प्रकार लोणीकाळभोर परिसरात उघडकीस आलाय. एका 34 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तब्बल एक महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


20 नोव्हेंबर 2016 रोजी रोहित पवार आणि रश्मी चव्हाण यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोनच महिन्यात पत्नीने रोहितसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबियांना त्रास नको म्हणून रोहित पत्नीसह स्वतंत्र राहू लागला, तरीही त्याचा त्रास काही कमी होत नव्हता. पत्नी आणि सासू त्याला मिळून त्रास देत होते. या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करू पाहणाऱ्या तिच्या आईलाही रश्मी आणि तिचे आई-वडील शिवीगाळ करायचे. रोहितने आई-वडिलांशी कुठली संबंध ठेवू नये असे रश्मीचे म्हणणे होते.
खर तर रश्मीला नोकरी करायची होती, पण रोहित तिला म्हणायचा की तू फक्त मुलावर लक्ष दे तुला काय हवं नको ते मी देईन. परंतु रश्मी आपल्या नोकरी करण्यावर ठाम होती यावरून देखील दोघात नेहमी वाद होत होते. 7 ऑगस्ट रोजी त्यांच्या याच कारणावरून भांडण झाले आणि रश्मी आई-वडिलांकडे माहेरी निघून गेली. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी रोहितने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
रोहितने आत्महत्या केल्यानंतर महिनाभरानंतर ढोलकीचे वडील आणि इतर कुटुंबीयांनी त्याचा मोबाईल चेक केला असता धक्कादायक माहिती समोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्याने “मी माझ्या जीवाचे बरे वाईट करत असून त्यास माझी पत्नी व सासू जबाबदार आहे” असे असे म्हटले होते.. त्यानंतर कुटुंबियांनी या सर्व प्रकाराबाबत लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.. पोलिसांनी याप्रकरणी पत्नी रश्मी आणि सासू लता राजेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -