ताजी बातमी ऑनलाईन टीम
टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सीरिज खेळायची आहे. पण या सीरिजपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोविड-19ची लागण झाली आहे. शमी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून (T- 20 Series) तो बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. मोहम्मद शमी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. शनिवारी टीम इंडिया मोहालीला पोहोचली तेव्हा शमीच्या कोरोना पॉझिटिव्हची माहिती बीसीसीआय आणि टीम व्यवस्थापनाच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. ऑस्ट्रेलियाची टीमही पंजाब शहरात पोहचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर पडल्यामुळे टीम इंडियाला धक्का बसला आहे. या सामन्यापूर्वी शमीनेच भारताला मोठा झटका दिला आहे. मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2021 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान खेळला होता. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे. मोहम्मद शमीने भारताकडून 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शमी जर कोरोनातून बरा झाला नाही तर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही खेळणे देखील कठीण होईल. टी-20 विश्वचषकासाठी निवडकर्त्यांनी मोहम्मद शमीला स्टँडबाय खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे.