सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्षबांधणीसाठी पुन्हा मैदानात उतरली आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती केली. अशातच आता भीमशक्ती-शिवशक्ती संघटनांदेखील शिवसेनेत दाखल झाल्या आहेत.
महाराष्ट्रातुन भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून, बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाई असे अनेकांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला. एक संघटन करून शिवसेनेसोबत आहोत. अशी प्रतिक्रिया संघटनांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेविरोधात बंड पुकारत कट्टर सेनानेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात शिंदे फडणवीस स्थापनं केलं. त्यानंतर राज्यातील राजकारणाला दिवसेंदिवस नवं वळण मिळत आहे. अशातच भीमशक्ती-शिवशक्ती संघटनांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जे काही महाराष्ट्रात घडलं ते कोणाला पटल नाही. एकनाथ शिंदेचं सरकार आहे ते व्यावहारिक दृष्टीने झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरेंना विनाकारण पाय उतार व्हावं लागलं आहे त्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.ज्या ज्यावेळी उद्धव ठाकरे आम्हाला आवाज देतील तेव्हा आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. अशा शब्दात संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
यानंतर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं. शिवतीर्थावर दसरा मेळावा हा आमचाच होईल. असे मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.
दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आक्रमत झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे. आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे.




