Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : इराणी खणीत बुडून पैलवानाचा मृत्यू

कोल्हापूर : इराणी खणीत बुडून पैलवानाचा मृत्यू

इराणी खणीत पोहण्यासाठी गेलेल्या न्यू मोतीबाग तालमीच्या पैलवानाचा बुडून मृत्यु झाला. शंकर बाबुराव चौगुले (वय 26 रा. अर्जुनवाडा ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. शंकर खुल्या गटातून राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत खेळत होता. तो महाराष्ट्र केसरीची तयारी करत होता. त्याच्या निधनाने कुस्तीक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबतची माहिती अशी, शंकर चौगुले हा न्यू मोतीबाग तालीम येथे 10 वर्षापासून तो सराव करत होता. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शंकर व त्याचा मित्र इम्रान सरकवास हे दोघेजण इराणी खणीत पोहण्यासाठी गेले होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने शंकर पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. इमरानच्या निदर्शनास ही बाब आली. त्याने पोहत जावून शंकरला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खोल पाण्यात बुडाला. पाण्याबाहेर येवून इम्रानने आरडाओरडा केला. यामुळे नागरीक जमा झाले. त्यांनी याची माहिती तत्काळ अग्नीशमन दलास तसेच जुना राजवाडा पोलिसांना दिली.

अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर दस्तगीर मुल्ला, सुनील वाईगडे, किसन पोवार, अनिकेत परब, प्रभाकर खेबुडे, बोटीच्या सहाय्याने शोध मोहिम सुरु केली. सायंकाळी सातवाजेपर्यंत शोधाशोध सुरू होती. मात्र चौगुले सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवली जाणार आहे. शंकरच्या पश्च्यात आई, वडील भाऊ असा परिवार आहे.

महाराष्ट्र केसरीचे स्वप्न अधुरे

शंकरचे वडील बाजीराव चौगुले हे पैलवान आहेत. तर मोठा भाऊ सोमनाथ हाही कुस्तीचे धडे गिरवतो. शंकर खुल्या गटातून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उतरला होता. गेल्या 5 वर्षापासून तो महाराष्ट्र केसरीसाठी तयारी करत होता. कोल्हापूरसाठी महाराष्ट्र केसरीची गदा आणण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -