Tuesday, December 16, 2025
Homeक्रीडाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका आजपासून सुरू, कधी व कुठे पाहता येणार,...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका आजपासून सुरू, कधी व कुठे पाहता येणार, वाचा..

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आजपासून टी-20 मालिका खेळवली जात आहे. असं म्हटलं जातंय की, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंचा दमदार सराव होण्यासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका आयोजित केली आहे. यांपैकी आता आज भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होणार आहे.

टीम इंडियाने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडूच या मालिकेत दिसणार आहेत. तत्पुर्वी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला कोरोना झाल्याने त्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाच्याही मिशेल स्टार्क, मिशेल मार्श व मार्कस स्टॉयनिस या खेळाडूंनीही माघार घेतली असून त्यांच्या जागी नॅथन एलिस, डॅनिएल सॅम्स व सीन एबॉट यांचा समावेश करण्यात आल्याचं समजत आहे.

भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, उमेश यादव, दीपक चाहर.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ – सीन एबॉट, ॲश्टन ॲगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ॲरोन फिंच, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनिएल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा.

T-20 Series: ind vs Aus चं वेळापत्रक:

▪️ पहिली ट्वेंटी-20- 20 सप्टेंबर- मोहाली, सायंकाळी 7.30 वा.पासून

▪️ दुसरी ट्वेंटी-20 – 23 सप्टेंबर- नागपूर, सायंकाळी 7.30 वा.पासून

▪️ तिसरी ट्वेंटी-20 – 25 सप्टेंबर- हैदराबाद, सायंकाळी 7.30 वा.पासून

▪️ थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टर, DD Sports

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -