Tuesday, December 16, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : खड्डयांमुळे आरकेनगर-मोरेवाडी रस्त्यावर अपघात

कोल्हापूर : खड्डयांमुळे आरकेनगर-मोरेवाडी रस्त्यावर अपघात

आरके नगर ते मोरेवाडी रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी खड्डयांमुळे अपघात झाला .यामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोरेवाडीहून आर के नगरकडे इनोव्हा ही चार चाकी गाडी येत होती .आर के नगर चौकाच्या जवळ मोठे खड्डे पडले आहेत . या खड्डयांमुळे मोटार चालकाने गाडीचा वेग कमी केला .यावेळी मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वारास वेग नियंत्रित न झाल्याने त्याची जोरदार धडक इनोव्हा गाडीला मागून बसली. यामध्ये मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत . या अपघातात चार चाकी आणि दुचाकी मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपूर्वीच ‘आरके नगर ते शांतिनिकेतन रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य ‘या सदराखाली तरुण भारत मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आरके नगर ते मोरेवाडी हा रस्ता खड्डयात गेला आहे. या खड्डयांमुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे तात्काळ मुजवावेत अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -