ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हिंमत असेल तर महिनाभरात पालिका निवडणुका घेऊन दाखवा असे थेट आव्हान यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला केले. आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा केला. या भाषणात उद्धव ठाकरेंचा रोख प्रामुख्याने भाजपवर होता. भाजपने मुंबईसाठी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी शिवेनेने काय केल हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच ही पहिली निवडणूक आहे असं समजून काम करा असे शिवसैनिकांना आवाहन केले.
ज्या नगरसेवकांना जायचं आहे, त्यांनी आत्ताच जा, दारं उघडी आहेत.
– ज्यांना जायचं होतं ते निघून गेले, शिवसेना जिथे आहेत तिथेच आहेत.
तुमचे चेले चपाते येथे बसलेले आहेत, त्यांना सांगात मनपा निवडणुका महिनाभरात घेऊन दाखवा,
– राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही महिनाभरात लावून दाखवा
अमित शाहांना उद्धव ठाकरेंच थेट आव्हान
– तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत
– तुम्ही हिंदू मुस्लिम करून पाहा, मुस्लिमही आमच्यासोबत
– तुम्ही मराठी-अमराठी करून पाहा, अमराठीही आणच्यासोबत
– गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयही आमच्या सोबत
– तोडा-फोडा-राज्य करा ही तुमची शाहानिती येथे यशस्वी होणार नाही
ही फडणवीसांच्या आयुष्यातील पहिली निवडणूक
– ही निवडणूक आपल्यासाठी पहिली निवडणूक आहे असं लढा
– नगरसेवक, आमदार, खासदार नाहीत असं समजून लढा
– सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहे
– पण मर्द असतो तो अशाच लढाईची वाट पाहत असतो
– आणि आम्ही याच लढाईची वाट पाहत आहोत
हिंमत असेल तर महिनाभरात पालिका, विधानसभा निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचं आव्हान
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -