तिकोंडी (ता.जत) एका ऊसतोड मुकादमाने एक लाख 10 हजार रूपये न दिल्याने त्याच्या पत्नीचे अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. रेणुका भिमाण्णा मांग (वय ३५, व्यवसाय मंजुरी रा. तिकोंडी, ता जत) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव असून सोमवारी दि. 19 सप्टेंबर रोजी मध्यवर्ती 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात भिमाण्णा धण्णाप्पा मांग (वय ४०, व्यवसाय उसतोड मुकादम रा. तिकोडी, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी राजु शिंगाडे (रा.गणी, ता. जमखंडी), हाज्या आंतालटी (रा. आंतालटी), संजु (पूर्ण नाव नाही) (रा. कनोळी ता. जमखंडी) व इतर तीन अनोळखी, अशा सहा जणांवर अपहणाचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादी भिमाण्णा मांग यांनी १,१०,०००/-रू दिले नाहीत म्हणून त्यांनी फिर्यादीची पत्नी रेणुका यांना त्यांनी आणलेल्या काळ्या रंगाच्या चार चाकी कार मध्ये घालुन पळवून नेले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक हाक्के करत आहेत.