ताजी बातमी ऑनलाईन टीम
लग्न समारंभ हा प्रत्येकासाठी भव्य असा कार्यक्रम असतो. प्रत्येकालाच आपलं लग्न भव्य दिव्य व्हावं असं वाटतं. त्यासाठी अनेक जण मंगलकार्यालय बुक करतात. परंतु लग्नासाठी मंगलकार्यालयच तुमच्या घरी आलं तर? प्रश्न ऐकूण विचारात पडला आहात का? पण हे शक्य आहे. प्रसिद्ध बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी अशात ट्विटर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात एक चालतं फिरतं मंगलकार्यालय दिसत आहे आणि हे मंगलकार्यालय सामान्य मगंलकार्यालयापेक्षा कुठेही कमी नाही. आनंद महिंद्रा यांनी (Anand Mahindra) हा व्हिडिओ पोस्ट करताना या पोर्टेबल मॅरेज हॉलच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.
सध्याच्या आधुनिकरणाच्या युगात मोबाईल टॉयलेटपासून ते मोबाईलक्लिनिकपर्यंत अनेक सुविधा लोकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र आता सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईच्या या काळात एक चालतं फिरतं मंगलकार्यालय पाहायला मिळत आहे. तुम्ही लग्नमंडपापर्यंत पोहचू शकत नसाल तर हे मंगलकार्यालयच तुमच्यापर्यंत येऊ शकते. कसं आहे हे मंगलकार्यालय तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. एका ट्रकचं रुपतांत अतिशय सृजनात्मक पद्धतीने लग्नमंडपात करण्यात आले आहे. आणि त्यात सर्व सुख सुविधा देखील आहेत.