Friday, December 19, 2025
Homeतंत्रज्ञानमारुती सुझुकीची खास कार लॉंच, वाचा जबरदस्त फीचर्स..

मारुती सुझुकीची खास कार लॉंच, वाचा जबरदस्त फीचर्स..

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली बहुप्रतीक्षित कार ग्रँड व्हिटारा लॉन्च केली आहे. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही पर्यायाचा वापर करून धावत असल्याने अतिशय फायदेशीर आहे, अशी माहिती आहे. मारूती सुझुकीची ही मजबूत मध्यम आकाराच्या एसयुव्ही प्रकारातील भारतातील पहिली कार आहे.

ग्रँड विटारा हायब्रिडमध्ये असलेले टोयोटा इंजिन एकत्रितपणे 116hp पॉवर जनरेट करते. हे इंजिन जास्त आवाज न करता रिअल टाइममध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल एकत्र करून शानदार ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स देते. तर याशिवाय कार पेट्रोल टू इलेक्ट्रिक मोडमध्ये सहज शिफ्ट करू शकणार आहात. यात खास इलेक्ट्रिक मोडसाठी एक बटणसुद्धा तुम्हाला दिलेले आहे.

भारतात या कारची 10.45 लाखापासून किंमत सुरू होते. त्याचबरोबर कंपनीने सांगितलं आहे की ही SUV चालवताना तुम्हाला 21 kmpl च्या जवळपास मायलेज मिळू शकते. सध्या राज्यात असणारे पावसाळ्यात पडलेले खड्डे आणि रस्ते पाहता यात जितके आवश्यक आहे, तितके ग्राउंड क्लीयरन्स देखील आहे. ज्यामुळे कठीण रस्त्यावरून व खड्ड्यातून गाडी चालवताना जास्त अवघड वाटत नाही.

Maruti Suzuki Grand Vitara SUV चे प्री-बुकिंग मागील काही दिवसांपूर्वी 11 जुलै रोजी 11,000 रुपयांच्या टोकन रकमेवर सुरू झाले होते. कंपनीने माहीती देत म्हटलं की, ग्रँड विटारा एसयूव्हीच्या अधिकृत लॉंचपूर्वीच खूप बुकिंग होत एका अहवालानुसार जवळजवळ 55,000 च्या पुढे गेले आहे. दिल्ली, नंतर हैदराबाद, पुणे, मुंबई आणि बेंगळुरू येथून जास्तीत जास्त बुकिंग केले गेले आहे.

इतर काही आकर्षक फीचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ABS सह EBD, ESC, क्रूझ कंट्रोल, हिल क्लाइंब आणि डिसेंट कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी फीचर्स आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -