Monday, August 4, 2025
Homeक्रीडाधक्कादायक! टीम इंडियाचा हुकमी एक्का ‘वर्ल्ड कप’मधून बाहेर, रोहितचं टेन्शन वाढलं…

धक्कादायक! टीम इंडियाचा हुकमी एक्का ‘वर्ल्ड कप’मधून बाहेर, रोहितचं टेन्शन वाढलं…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आहे.. ऑस्ट्रेलियात आयोजित टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आलेली असताना, टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यंदाच्या या वर्ल्ड कपमधून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजानंतर आणखी एक स्टार बॉलर बाहेर झाला आहे.



टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘बीसीसीआय’ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेचे आयोजन केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया थेट वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहे.

‘याॅर्कर किंग’ला पुन्हा दुखापत

मात्र, त्याआधीच भारतीय संघासाठी बॅड न्यूज समोर आलीय.. टीम इंडियाचा ‘याॅर्कर किंग’ व रोहित शर्माचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह हाही टी-20 वर्ल्ड कपमधून ‘आऊट’ झालाय. दुखापतीमुळे बुमराहलाही यंदाच्या वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे. टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहला आशिया कपमध्ये खेळता आलं नव्हतं. त्याच्या गैरहजेरीचा टीम इंडियाला मोठा फटका बसला होता. ‘सुपर फोअर’ फेरीतूनच टीम इंडियाला पॅकअप करावं लागलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत नागपूरमधल्या सामन्यात बुमराह कमबॅक केलं. हैदराबादमधील सामनाही तो खेळला. त्यामुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच, पुन्हा एकदा बुमराहच्या दुखापतीने उचल खाल्ली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना, त्याची दुखापत पुन्हा उफाळून वर आली. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळवले नव्हते. ‘बीसीसीआय’ची मेडिकल टीम बुमराहच्या दुखापतीवर लक्ष ठेवून होती. मात्र, आता त्याच्या दुखापतीचं स्वरुप मोठं असल्याचे समोर आले असून, तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.

शमी की दीपक चहर..?

हाती आलेल्या बातमीनुसार, बुमराहच्या पाठीची दुखापत गंभीर असली, तरी त्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु त्याला पुढील 4-6 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.. टी-20 वर्ल्ड कपसाठी मोहम्मद शमी व दीपक चहर यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली असली, तरी त्यांच्यापैकी एकाचीच मुख्य संघात निवड होऊ शकते.

कोरोनातून शमी सावरला असला, तरी आधी त्याची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. दुसरीकडे दीपक चहरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता बुमराहच्या जागी कोणाची निवड होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -