Friday, January 30, 2026
Homeअध्यात्मनवरात्रीची पाचवी माळ स्कंदमातेला समर्पित, जाणून घ्या शुभ रंग, मंत्र आणि पूजा...

नवरात्रीची पाचवी माळ स्कंदमातेला समर्पित, जाणून घ्या शुभ रंग, मंत्र आणि पूजा विधी

दुर्गा मातेच्या नऊ रूपांपैकी एक असलेल्यादेवी स्कंदमातेची ( Skanda mata) पूजा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केली जाते. स्कंदमाता ही जननी असून तिच्या कृपेने संतान प्राप्तीचे सुख मिळते. विशेषत: ओटी भरावी यासाठी या मातेचे विशेष पूजन केले जाते. कोणाला अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर ते ब्राम्हणाला विचारून स्कंदमातेची पूजा करू शकतात. एखाद्या व्यक्तीला धन, कीर्ती हवी असेल तर त्याने पूर्ण विधीपूर्वक स्कंदमातेची पूजा करावी.

पार्वतीच्या मातृस्वरूपाला स्कंदमाता म्हणतात. तिचे नाव स्कंदमाता ठेवण्यात आले कारण ती योद्धा देव स्कंदची आई आहे, ज्याला कार्तिकेय आणि मुरुगन असेही म्हणतात. हिंदू धर्मग्रंथानुसार देवी स्कंदमाता सिंहावर स्वार असून तिला चार हात आहेत. एका हातात त्यांनी आपला पुत्र भगवान स्कंद अर्भकाच्या रूपात धरला आहे आणि दुसरा हात अभयमुद्रामध्ये आहे, जो सर्व भीती दूर करतो. त्यांच्या इतर दोन हातात कमळाची फुले आहेत. या देवीचे वाहन सिंह आहे.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्नान वगैरे करुन स्कंदमातेचे स्मरण करावे. यानंतर स्कंदमातेला अक्षत, धूप, सुगंध, फुले अर्पण करा. त्यांना बताशा, पान, सुपारी, लवंग, मनुके, कमलगट्टा, कापूर, गूगूळ, वेलची इत्यादी अर्पण करा. त्यानंतर स्कंदमातेची आरती करावी. स्कंदमातेची पूजा केल्याने भगवान कार्तिकेयही प्रसन्न होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -