Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : कोल्हापूर विमानतळावर प्रवाशाकडून जिवंत काडतुस जप्त

Kolhapur : कोल्हापूर विमानतळावर प्रवाशाकडून जिवंत काडतुस जप्त

आज दुपारी कोल्हापूर- तिरुपती विमानाने निघालेल्या प्रवाशाकडून जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. केवल बाजीराव कुन्हाडे (वय 24 ) रा. नांदगाव तालुका करवीर असे नाव असलेल्या इसमाकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला, हा प्रवासी विमानतळावर आला असता मुख्य गेटवर त्याच्याजवळ असलेली हँडबॅग स्कॅनिंग केली गेली. त्यावेळी या बॅगेमध्ये विनापरवाना जिवंत काडतुस सापडल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये त्याच्याकडे 6 सेमी लांबीच्या टोकाकडील बाजूस निमुळता होत गेलेल्या व पाठीमागील बाजूस तीन ठिकाणी 4,10,6 व 5.56 असे नमूद केलेल्या पितळी धातूचे एक जिवंत काडतुस मिळाले.

इतर प्रवाशांच्या जिवितास हानी पोहोचवणे व विमानतळ सुरक्षितता धोक्यात आणण्याचे हेतूने असे हत्यार जवळ बाळगले म्हणून मंजुरामत बाशिर मुल्ला नेमणूक विमानतळ सुरक्षारक्षक पोलीस यांनी याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कांबळे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -