Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर-गगनबावडा मार्गावर महाकाय वटवृक्ष कोसळला; वाहतूक ठप्प

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर महाकाय वटवृक्ष कोसळला; वाहतूक ठप्प

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर -गगनबावडा या राज्य मार्गावर दोनवडे फाटा येथे शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता महाकाय वटवृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे कोकण- गोव्याकडे जाणाच्या वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.



शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास या परिसरात प्रचंड वादळी पाऊस झाला. या पावसामुळे कोल्हापूर- गगनबावडा राज्य रस्त्यावरील दोनवडे फाट्यानजीक शंभर वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष अचानक रस्त्यावर कोसळला. प्रचंड वाहतूक असणाऱ्या या रस्त्यावर सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन नसल्याने जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने या मार्गावरून कोकण, गोव्याकडे होणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. मात्र साबळेवाडी, खुपिरे, वाकरे फाटामार्गे या पर्यायी मार्गे वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. सायंकाळपर्यंत बांधकाम विभागाच्या वतीने हा वटवृक्ष बाजूला करण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -