ताजी बातमी ऑनलाईन टीम
ग्रोबझ ट्रेडींग, ग्रोबझ वेल्फेअर आणि ग्रोबझ निधी या तीन कंपन्यांतील गुतंवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 42 लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या 14 जणांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याप्रमाणे पाच संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणूकीची रक्कम कोटीत जाण्याची शक्यता आहे.
कंपनीचे प्रमुख विश्वास निवृत्ती कोळी (वय 45, रा. बावची, ता. वाळवा, सांगली), उज्वला शिवाजी कोळी (रा. यशोधा विश्वास कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), सौरभ कोळी (वय 25, रा. बावची), सोमनाथ कोळी (वय 40), ग्रामसेवक स्वप्नील शिवाजी कोळी (वय 38, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. एप्रिल,2022 पासून संशयित पसार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
विश्वास कोळी याने जानेवारी 2021 मध्ये शाहूपुरी चौथी गल्ली येथे कार्यालय सुरु केले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एजंट नेमले. केलेल्या गुंतवणुकीवर 10, 15, 20 टक्के व्याज देण्यास प्रारंभ केला. 1 लाख रुपये गुंतवणूक करणायास प्रत्येक महिन्याला 10 हजार व्याज मिळत होते. 18 महिने व्याज घेतल्यानंतर गुंतवणूकदारास 1 लाख रुपये परत केले जात होते. अशा प्रकारे पाच जणांनी कोल्हापूर, सांगली, बेळगाव येथील शेकडो गुंतवणूकदारांकडून लाखो रुपये गोळा केले.
कोल्हापूर ; गुंतवणुकदारांची ४२ लाखांची फसवणूक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -