ताजी बातमी ऑनलाईन टीम
गोवा आणि कर्नाटकातून कोल्हापूरमार्गे राज्यात दारु तस्करी होते. त्यातील लहान मोठय़ा अनेक मार्गावर आता पोर्टेबल नाके बसवले जातील. दारु तस्करीत दोनपेक्षा अधिकवेळा सापडणारया लोकांवर मोकासारखा गुन्हा दाखल करण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. तसे प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठवण्याच्या सुचना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारयांना दिल्या असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीनंतर देसाई म्हणाले, गोवा राज्यातून येणारया मार्गावर कडक तपासणीसाठी नाके उभारण्यात येतील. उत्पादन शुल्क राज्यात तिसरया क्रमांकाचे उत्पन्न देणारे खाते असून गतवर्षी 17 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल राज्याला दिला. अवैध दारु वाहतूक रोखण्यासाठी तात्पुते नाके उभारणीसह फ्लाईंग स्क्वॉड सक्षम करुन उत्पादन वाढवले जाईल. उत्पादन श्ल्कुमधील रिक्तपदे एमपीएससी मार्फत भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. रिक्त जागांपैकी 50 टक्के जागांची विभागांतर्गत होणारी भरती लवकरच सुरू केली जाईल.
कोल्हापूर ; दारु तस्करांना मोका लावणार; मंत्री शंभूराजे देसाई
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -