ताजी बातमी ऑनलाईन टीम
बहचर्चित बॉलीवूड चित्रपट दृश्यमचा दुसरा पार्ट लवरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या आगामी ‘दृश्यम 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दृश्यम 2चा टीझर शेअर केला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र आज 2 ऑक्टोबरनिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांना एक खास भेट दिली आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असलेला अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तिकिटांच्या किमती कमी केल्या होत्या, त्याचप्रमाणे आता ‘दृश्यम 2’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगसाठी तिकीट कमी केले आहे. 2 ऑक्टोबरला म्हणजेच आज चित्रपटाचे तिकीट घेतल्यास त्यावर 50 टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच आज ‘दृश्यम 2’चे तिकीट बुक केल्यास ओपनिंग डेचं तिकीट अर्ध्या किमतीत मिळणार आहे.