Sunday, August 3, 2025
Homeयोजनानोकरीदहावीच्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, रेल्वेत 3115 पदांसाठी भरती…

दहावीच्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, रेल्वेत 3115 पदांसाठी भरती…

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर यांसह विविध ट्रेड्समध्ये ३ हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती होत आहे.

‘ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती-2022’साठी (Indian Railway Recruitment 2022) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्जच स्वीकारले जातील, असे नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

एकूण जागा – 3115

विभागवार पदसंख्या

हावडा डिव्हिजन – 659 पदे
लिलुआ वर्कशॉप – 612 पदे
सियालदह डिव्हिजन – 440 पदे
कांचरापाडा वर्कशॉप – 187 पदे
मालदा डिव्हिजन – 138 पदे
आसनसोल वर्कशऑप – 412 पदे
जमालपूर वर्कशॉप – 667 पदे
शैक्षणिक पात्रता

उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून दहावी-बारावीची परीक्षा 50 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
संबंधित ट्रेड उदा. वेल्डर, शीट मेटल, वर्कर, लाइनमन, वायरमन, आणि पेंटर विषयात एनसीव्हीटी/एससीव्हीटीकडून मान्यताप्राप्त संस्थेतून ‘आयटीआय’ उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे, आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्जशुल्क –

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्ग – 100 रुपये
एससी, एसटी, दिव्यांग, महिला – नोंदणी शुल्क नाही.

अर्ज भरण्यास सुरुवात – 30 सप्टेंबर 2022

अर्ज भरण्यासाठी अखेरची मुदत – 29 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- er.indianrailways.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -