Tuesday, August 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : अनैतिक संबंधातून कसबा बावडा येथे महिलेचा खून

कोल्हापूर : अनैतिक संबंधातून कसबा बावडा येथे महिलेचा खून

अनैतिक संबंधातून महिलेचा कोयत्याने सपासप वार करुन गळा चिरुन निघुण खून करण्यात आला. कविता प्रमोद जाधव (वय 38 मुळ रा. कसबा तारळे सध्या रा. लाईन बाझार) असे मृत महिलेचे नांव आहे. या प्रकरणी राकेश शामराव संकपाळ (वय 30 रा. कसबा बावडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. खूनानंतर राकेश संकपाळ स्वतःहून पोलीस मुख्यालयामध्ये हजर झाला. कसबा बावडा लाईन बाझार परिसरात रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसर हादरला.

याबाबतची माहिती अशी, कसबा तारळे येथील कविता जाधव यांच्या पतीचे 4 वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. कविता जाधव शिवणकाम तसेच भावाच्या चपलाच्या दुकानामध्ये काम करुन उदरनिर्वाह चालवितात. अविवाहीत असणारा राकेश संकपाळ व कविता जाधव हे नातलग आहेत. दोन वर्षापूर्वी कविता यांची मुलगी आजारी पडली होती. या काळामध्ये कसबा बावडा येथे आई, वडील, भावासोबत राहणाऱ्या राकेशने कविताला मदत केली होती. यातून या दोघांची मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले.

गेल्या 2 वर्षापासून कविता व राकेश यांचे प्रेमसंबंध होते. राकेश कविताकडे वारंवार लग्नाची मागणी करत होता. मात्र कविताने नकार दिला. यातून या दोघांमध्ये महिन्याभरापासून वाद सुरु होता. दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेला. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद मिटविण्यासाठी राकेशने कविता व त्यांच्या भावाला रविवारी सकाळी घरी भेटण्यास बोलाविले.

12 वाजण्याच्या सुमारास कविता व तिचा भाउ राकेशच्या घरी आले. यावेळी राकेशने पुन्हा लग्नाचा विषय काढला. कविताच्या भावाने कविताला समजावून सांगून लग्न करण्याचा सल्ला दिला. कविताचा भाउ दोघांची समजूत काढून कसबा तारळे येथे निघून गेला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. झटापटही झाली. यातून चिडून राकेशने कवितास मारहाण करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या राकेशने जवळच असलेल्या धारदार कोयत्याने कविताच्या गळ्यावर जोरदार वार केला. यामुळे कविताची अर्धीमान तुटली. त्यानंतरही राकेशने तिच्या मानेवार सपासप 6 वार केले. रक्ताची धार लागल्यामुळे संपूर्ण खोलीमध्ये रक्ताचे डाग पडले होते. राकेशच्या कपडय़ांवरही रक्ताचे डाग पसरले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -