Wednesday, August 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण

कोल्हापूर : पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण

पैशाच्या व्यवहारातून व्यापाऱ्यास मारहाण करुन भरदिवसा त्याचे अपहरण केल्याची घटना लक्ष्मीपुरी येथील चांदणी चौक परिसरात घडली. अमृत राजेंद महाडिक असे अपहरण झालेल्या व्यापारयाचे नांव असून लक्ष्मीपुरी पोलिसांनी 24 तासामध्ये अमृत महाडिक यांची सुटका केली. दरम्यान या प्रकरणी अजिज मकानदार (रा. सदलगा, बेळगांव) याला अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृत महाडिक यांचे ब्राईट साईट एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. त्यांचा बेळगांव येथील अजिज मकानदार यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार आहेत. यातून या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अजिज मकानदार चार ते पाच जणांना सोबत घेवून अमृत महाडिक यांच्या लक्ष्मीपुरी चांदणी चौक येथील कार्यालयामध्ये आले होते. यावेळी अमृत महाडिक व अजिज मकानदार यांच्यामध्ये वाद झाला. यावादातून अजिज मकानदार व त्यांच्या साथीदारांनी अमृत महाडिक यांना मारहाण केली. तसेच त्यांना मोटारीतून घेवून गेले.

याची माहिती ऑफिसमध्ये काम करणारया पुनम माने यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश जाधव यांनी याचा तपास करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती केली. सिसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना जेरबंद केले. तसेच अमृत महाडिक यांची सुटका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -