बलात्कार केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी एकास अटक केली. योगेश उत्तमगिर गिरी (वय ३०, रा. साईनगर, देगलूर, ता.देगलूर, जि.नांदेड) असे त्याचे नाव आहे. जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालयाने संशयीताला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरोळ तालुक्यातील पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
पिडित महिलेला मैत्रिण असल्याचे भासवून तिच्या व्हॉटसअपवर चॅटिंगव्दारे संशयीताने संपर्क वाढवून ओळख निर्माण केली. मात्र, त्याची खरी ओळख समजल्यानंतर महिलेने त्याच्यासोबत चॅटिंग बंद केले. तरीदेखील तो महिलेला दुसऱ्या सीमकार्डवरुन मेसेज तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून हॉटेलवर नेले. त्याठिकाणी कोल्ड्रींगमध्ये गुंगीचे औषध देवून तिच्यावर बलात्कार केला. १५ सप्टेंबरला पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे यांच्या युक्तीवाद केला.गिरी याला आठ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.