शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील जोरदार हल्लाबोल केला. हे आहेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
“यंदाचा रावण 50 खोकासूर आहे”
येथे एकही माणूस भाड्याने आणला नाही. जे लोक आले ते स्वखर्चाने आले आहेत. हे प्रेम विकत मिळत नाही. ही ठाकरे कुटूंबाची कमाई आहे. म्हणून मी तुमच्यासमोर नतमस्तक झालो. दरवर्षी दसऱ्याला मेळव्याला रावण जाळला जातो, पण यंदाचा रावण वेगळा आहे. काळ बादलतो तसा रावणही बदलतो. यंदाचा रावण 50 खोक्यांचा, खोकासूर आहे. ज्यांच्यावर जाबाबदारी दिली ते कटप्पा बनले. कट करणारे आप्पा म्हणजे कटप्पा. यांनी कट करून गद्दारी केली, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
तुम्ही मला पक्षप्रमुख पदावरुन हटवायला निघालात? पण तुम्ही हे मला सांगाणारे कोण? एका शिवसैनिकाने जरी सांगितलं तरी पद सोडेने. मी हिंदूत्व सोडलं असे ते म्हणत आहे. पण मी हिंतूत्व सोडलं हे शिवसैनिकांनी सांगावं, गद्दारांनी नाही. यांना स्वत:चे विचार नाहीत, म्हणून बाळासाहेबांचे फोटो लावताहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सुरू आहे, राज्यातील प्रकल्प गुजरातला जात आहेत, तरीही मिंधे सरकार ‘उठेगा नाही साला’ असं म्हणत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. आनंद दिघे जाऊन 20 वर्षे झाली आणि आता यांना दिघे आठवताहेत. कारण आता आनंद दिघे बोलायला नाहीत. ते शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. बाप चोरांवर या मेळाव्यात जास्त बोलणार नाही.
देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील हल्लाबोल केला. तुम्ही म्हणाले होतात मी परत येईल, परत येऊन उपमुख्यमीत्री झाला. तुम्ही खूप ज्ञानी आहात. तुम्हाला कायदा चांगला कळतो. आम्ही कायदा पाळायचा अन तुम्ही डुकरं पाळायची. नवी मुंबईच्या मढवींना एन्काउंटरची धमकी दिली जाते, तुमचा एकतर्फी कायदा चालू देणार नाही. शिवसैनिकांवरील अन्याय मी सहन करणार नाही. मी सांगतोय म्हणून सगळे शांत आहेत.
“अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरलं होतं”
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरलं होतं हे मी शपथ घेऊन सांगतो. आता जे केलं तेच तेव्हा शहांनी का केलं नाही. भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. भाजपकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. बिल्किस बानू प्रकरणातील आरोपीचा गुजरातमध्ये सत्कार होतो. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील आरोपी नेता कोण? असा सवाल करत महिलांचा अनाधर करणारं आमचं हिंदूत्व नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
न बोलवता केक खायला जाणारे कोण?”
मोदींच्या मुलाखती आजही ऐकतोय आम्ही. पाकव्याप्त काश्मीरमधील एक इंचही घेऊ शकला नाहीत.
हिंमत असेल तर चीनने घेतलेली जमीन परत मिळवून दाखवा, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. तिकडे शेपटा घालयच्या आणि इंकडे येऊन पंजे दाखवता. न बोलवता केक खायला जाणारे कोण? जिन्नाच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची अवलाद आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला.
“हा देश हुकुमशाहीकडे जात आहे”
अमित शाह देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री आहेत, देशभर फिरुप फोडाफोडी करत आहेत. महाराष्ट्रात येऊन आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करतात, हे पाहा आम्ही जमीनीवर बसलेलो आहोत. तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. नड्डा म्हणाले सर्व पक्ष संपत आहेत, मी तुम्हाला सावध करतोय हा तुमच्यासाठी सावधानतेचा इशारा आहे की सर्व पक्ष संपवून हा देश हुकुमशाहीकडे जात आहे.
“हे तोतये शिवसेना पळवायला निघालेत”
मोहन भागवत मशिदीत जातात, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जातं. भागवत मशिदीत गेले तर तुम्हाला चालतं, आम्ही काँग्रेससोबत गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडलं. तुम्ही सोबत असताना औरंगाबदचं संभाजीनंगर आणि उस्मानाबादचं धाराशिव केलं नाही, पण मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना करून दाखवलं. एकदा असा विचार आला की बीकेसीवर जावं आणि नव्या हिंदूत्वाचा विचार ऐकावा. रावणाने सन्यासाचा वेश घेऊन सीता पळवली तशी हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून आपली शिवसेना पळवायला निघाले आहेत.
“पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन”
आज माझ्याजवळ काहीच नाही, माझ्यासोबत चालायचं असेल तर तयारी लागेल. वाटेत काट्यावर, निखाऱ्यांवर चालावं लागेल. मात्र तुमच्या या निष्ठेच्या आगीतून शिवसेनेचा वणवा पेटणार आहे. तुम्ही फक्त साथ द्या, मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असा विश्वास यावेली उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.





