Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगार तेजीत

कोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगार तेजीत


बंद बंगले, फार्महाऊसवर दिवस-रात्र ठिय्या… मटण, दारूची सरबराई… बसल्या जागेवर सोयीसुविधा… अन् झटपट पैशांच्या हव्यासातून कोल्हापूर जिल्ह्यात मटका, जुगाराचे डाव रंगत आहेत. शहरासह आसपासच्या काही फार्महाऊसवर बिनदिक्कत हे प्रकार सुरू आहेत. जून आणि जुलै या दोन महिन्यांत पोलिस कारवाईतून 103 प्रकार उघडकीस आले असले, तरी अजूनही पिसणी सुरूच आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांडगाव (ता. करवीर) येथील शेडमध्ये छापा टाकून मटकाबुकी विजय पाटील याच्यासह 11 जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी रोख 40 हजार रुपयांसह देशी-विदेशी दारू, मोबाईल, दुचाकी असा सुमारे 3 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याचवेळी जयसिंगपूर येथील पाकिजा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळावर छापा टाकून 25 जणांना ताब्यात घेण्यात आले.
विजय पाटील याच्या कांडगाव येथील याच हॉटेलच्या शेडमध्ये यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली होती. तर जयसिंगपुरात तंबाखूच्या बंद गोडावूनमध्ये असणारा जुगारअड्डा उघडकीस आला. अशाच पद्धतीने छुप्या पद्धतीने सुरू असणार्या इतर जुगारअड्ड्यांवरही कारवाईची आवश्यकता आहे. टी.व्ही., दारू अन् जेवणही
उपनगरांतही अनेक ठिकाणी जुगारअड्डे सुरू आहेत. जुगार खेळणार्यांसाठी टी.व्ही.सह जेवण, सोबत दारूही जागेवर पुरविण्यात येते. यासाठी संबंधित फ्लॅटधारक वेगळे पैसे आकारतो. सर्व काही जागेवरच मिळत असल्याने जुगारी दिवस-रात्र अड्ड्यावर असतात.
फार्महाऊस तेजीत
कोल्हापूर जिल्ह्यात फार्महाऊसचे सध्या पेव फुटले आहे. कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असली, तरी अशा फार्महाऊसचा आडोसा घेऊन जुगाराचे डाव सुरू आहेत. पर्यटनाच्या नावाखाली अनेक ठिकाणी सुरू असलेल्या फार्महाऊसमध्ये काळेधंदे करणार्यांवर पोलिस कारवाईची आवश्यकता असल्याचे समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -