Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्र'शिवसेना संपणार नाही, उलट.. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी...

‘शिवसेना संपणार नाही, उलट.. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी व्यक्त केले स्पष्ट मत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यावर शिवसेनेच्या नेत्यांसोबत इतर पक्षांचे देखील नेते प्रतिक्रिया देत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल.’, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.



शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘शिवसेना अजिबात संपणार नाही. तर उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील. या निर्णयानंतर महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे कायम एकत्र राहतील, यात काही शंका नाही, असे मत देखीलत त्यांनी व्यक्त केले. आता जी पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शरद पवारांनी पुढे सांगितले की, ‘निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत मला अजिबात आर्श्चय वाटत नाही. हे होणार याची मला खात्री होती.’ तसंच, ‘हल्ली निर्णय कोण घेते, हे मला माहिती नाही. निर्णय हे गुजरातवरून घेतले जातील, यांची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असे काही तरी घडेल, हे गेल्या काही दिवसांपासून मला वाटते होते आणि ते घडले. पण, असे घडेल, असे मला माझे मन सांगत होते.’, असे देखील त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या चिन्हासंदर्भात शरद पवार यांनी सांगितले की, पुढे निवडणुकांना जर सामोरे जायाचे असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल. ती जे चिन्ह ठरवेल, ते चिन्ह शेवटपर्यंत टिकेलच, असे सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो वा नसो, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. नवीन चिन्ह घ्यायचे आणि निवडणूक लढवायची.’, असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -