Tuesday, July 8, 2025
Homeक्रीडाMS Dhoni : चेन्नईचा 'थाला' IPL 2023 खेळणार नाही?, सर्वात मोठी अपडेट...

MS Dhoni : चेन्नईचा ‘थाला’ IPL 2023 खेळणार नाही?, सर्वात मोठी अपडेट समोर!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महेंद्रसिंग धोनी म्हणजे क्रिडाविश्वातील नावाजलेलं नाव. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती घेतली. असं असलं तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मात्र, आता धोनी आयपीएलचे सामने खेळणार की नाही?, असा सवाल मागील वर्षापासून विचारला जातोय. अशातच आता धोनीच्या फॅन्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे.



धोनी आयपीएल खेळणार नाही , अशी चर्चा क्रिडाविश्वात सुरू होती. त्यावर धोनीने (MS Dhoni) देखील उत्तर दिलं नव्हतं. अशातच नुकताच धोनी चेन्नईला गेला असताना फॅन्सने त्याला आयपीएल खेळणार की नाही, याबद्दल विचारलं. त्यावेळी आम्ही पुढच्या वर्षी चेपॉकवर पुन्हा येऊ, असं उत्तर धोनीने दिलं. त्याविषयीचं ट्विट चेन्नईच्या संघाच्या (CSK) ऑफिशिअल अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मागच्या आयपीएलवेळी धोनीने निवृत्ती घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, धोनीला चेन्नईच्या मैदानावर निवृत्ती घेण्याची इच्छा आहे. तसं त्याने मागील आयपीएलच्या अखेरच्या सामन्यानंतर बोलून देखील दाखवलं होतं.

धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 4 वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे धोनीने विजयी निरोप द्यावा, अशी इच्छा चेन्नईचे फॅन्स (CSK Fans) करत आहेत. मागील IPL 2022 मध्ये धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा (CSK Captain) राजीनामा दिला होता. त्यानंतर जडेजाला कॅप्टन करण्यात आलं. मात्र, जडेजाने कॅप्टनसी करण्यास नकार दिल्याने धोनीला पुन्हा कॅप्टन करण्यात आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -