ताजी बातमी ऑनलाईन टीम
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तात्पुरते गोठविल्यानंतर ठाकरे गटाने पक्षासाठी तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. यातील कोणते नाव आणि कोणते चिन्हं उद्धव ठाकरे गटाला मिळणार, याचा फैसला निवडणूक आयोग सोमवारी करणार आहे.
सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत याबाबत पर्याय देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना केली होती. ठाकरे गटाने पर्यायी नावे आणि चिन्हे सादर केली असली तरी शिंदे ग अद्याप ती सादर केलेली नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिंदे गट पर्यायी चिन्हे आणि नावे शक्यता आहे.