ताजी बातमी ऑनलाईन टीम
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गटाडून नव्या नावाची आणि चिन्हाच्या पर्यायाबाबत हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटाने आयोगाकडे तीन नावे आणि तीन चिन्हांचे पर्याय सादर केले आहेत. पण शिंदे गटाने रात्री उशीरापर्यंत आयागोकडे कोणतेही पर्याय सादर केले नाहीत. यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत शिंदे गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशीरा आमदार आणि खासदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वाच एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे गटामध्ये तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिंदे गटाने मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. आज शिंदे गट अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे.
या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘आपल्याकडे लोकप्रनितिधींची संख्या जास्त आहे त्यामुळे चिंता करायची काहीच गरज नाही. धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही याची कल्पना ठाकरे गटाला होती त्यामुळेच त्यांनी सर्व चिन्हांची तयारी ठेवली होती. कारण त्यांना माहित आहे आपल्याकडे संख्याबळ कमी आहे.’ तसंच ‘देशात जे घडलं तेच आपल्यासोबत घडेल, लोकप्रतिनिधींचे संख्याबळ ज्यांच्याकडे जास्त असते त्यांना न्याय दिला जातो. आपल्यालाही न्याय मिळेल.’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.