Friday, December 19, 2025
Homeमहाराष्ट्रअतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे सांगून येथे दोघांची फसवणूक ; आरोपीस अटक

अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे सांगून येथे दोघांची फसवणूक ; आरोपीस अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करून क्लार्क पदी सरकारी नोकरीस लावतो असे सांगून 1,50,000 ची मागणी करुन त्यापैकी 57,00 रुपये रक्कम घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत बाबुराव गाडे (वय 35) रा. कालवडे ता. कराड जि. सातारा यास अटक केली असून फिर्याद जावेद नजीर मुलाणी रा. कोकरूड यांनी कोकरूड पोलिसांत दिली आहे.


पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी – जावेद नजीर मलाणी रा. कोकरूड यास आरोपी प्रशांत बाबुराव गाडे रा. कालवडे, ता. कराड, जि.सातारा यांने तो रत्नागिरी येथील कलेक्टर ऑफिस येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नोकरीस असल्याची बतावणी करून फिर्यादीच्या बहिणीस क्लार्क पदी सरकारी नोकरीस लावतो असे सांगून 1,50,000 रुपये ची मागणी करुन त्या पैकी 5700 रुपये रोख रक्कम आज फिर्यादीच्या कोकरूड येथील इलेक्ट्रॉनिक दुकानात घेवून फसवणूक केल्या प्रकरणी, आरोपी प्रशांत बाबुराव गाडे यास अटक करण्यात आली असून सपोनी ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, अधिक तपास पीएसआय संजय पाटील करीत आहेत.

कोकरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोकरूड पोलीस स्टेशन ला संपर्क साधन्याचे आवाहन सपोनी ज्ञानदेव वाघ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -