बॉलिवूडमध्ये जेव्हा-जेव्हा अभिनेत्रींच्या सौंदर्य आणि अभिनयाची चर्चा होते तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा आवर्जून उल्लेख होतो. रेखा ह्या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्रींपैकी एक आहे. रेखा आज म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत रेखा यांनी एकापेक्षा एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. या चित्रपटांपेक्षा त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये विशेषतः रेखा आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची चर्चा आजही होते.
या जोडीने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यात मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, मिस्टर नटवरलाल, खून पसीना, दो अंजाने, आलाप, गंगा की सौगंध, सुहाग, राम बलराम अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट करत असतानाच दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांचे अफेअर सुरु झाल्याचे बोलले जाते. मात्र रेखा किंवा अमिताभ यांनी या चर्चेला कधीच दुजोरा दिला नाही.
रेखामुळे निर्माण झाला होता बच्चन कुटुंबात वाद
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया बच्चन ह्यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर देखील अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअर बद्दल चर्चा होत तशा बातम्या देखील समोर यायच्या. यामुळे जया बच्चन खूप संतापल्या होत्या. रेखामुळे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या वैवाहिक जीवनात वाद निर्माण होत त्यांचा कौटुंबिक कलह वाढत होता. यामुळे रेखापासून अंतर राखणे अमिताभ यांनी पसंत करत दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत चित्रपट करण्यास देखील नकार दिला होता.