टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर-12 सामन्यांना आज ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडमधील मॅचपासून सुरुवात झाली. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात उद्या (रविवारी) सामना होणार आहे. त्याआधीच क्रिकेट रसिकांसाठी ‘गुड न्यूज’ आलीय.
काही दिवसांपासून मेलबर्नमध्ये पाऊस पडत होता.. त्यामुळे भारत पाक सामना होणार की नाही, अशी चर्चा सुरु झाली होती. पण, या सामन्याआधी थेट मेलबर्नमधून आनंदाची बातमी आलीय. आज दिवसभर मेलबर्नमध्ये पाऊस झालेला नाही.
मेलबर्नमध्ये पावसाची विश्रांती
ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार रविवारी (ता. 23) मेलबर्नमध्ये 60 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील ‘ब्लॉकबस्टर’ सामना अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, शनिवारी सकाळी पाऊस न झाल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळलीय.
बदलत्या हवामानामुळे दोन्ही संघांनी ‘प्लेईंग-11’बाबत माहिती दिलेली नाही. मेलबर्नमध्ये दर मिनिटाला हवामान बदलत आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून प्लेईंग-11 ठरवणार असल्याचे कॅप्टन रोहित शर्मा याने सांगितले. सध्या दोन्ही संघ जोरदार सराव करीत आहेत.