Friday, December 19, 2025
Homeक्रीडाटीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता, या स्टार खेळाडूचे पुनरागमन निश्चित!

टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता, या स्टार खेळाडूचे पुनरागमन निश्चित!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत जबरदस्त सुरुवात केली. आता टीम इंडियाचा महामुकाबला नेदरलँडसोबत होणार आहे. टीम इंडिया आज (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. सिडनीतील ऐतिहासिक सिडनी क्रिकेट मैदानावर दोन्ही टीममध्ये सामना रंगणार आहे. विश्वचषक स्पर्धेत दुसरा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली असून या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग-11 मध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टीम प्लेइंग-11 कशी असेल यांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.



टीम इंडिया आजच्या सामन्यात काहीसा बदल करु शकते. नेदरलँडविरुद्ध टीम इंडिया मैदानामध्ये एका बदलासह उतरु शकते. टीम इंडिया ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जागी सिनिअर लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला नेदरलँड्सविरुद्धच्या अंतिम प्लेइंग-11 स्थान मिळू शकते. टीम इंडियाचे स्टार खेळाडू युझवेंद्र चहल आणि ऋषभ पंत यांना मागच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हर्षल पटेलला देखील बाहेर बसावे लागले होते. पुढच्या सामन्यात हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. त्याच्या जागी ऋषभ पंतला खेळण्याची संधी मिळू शकते.

टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच नेदरलँडच्या टीमसोबत खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडिया नेदरलँडविरुद्ध दोन वनडे सामने खेळली होती. टीम इंडियाने 2003 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला होता. टीम इंडियाने आजच्या सामन्यात सिडनीमध्ये नेदरलँडचा पराभव केला तर टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील मार्ग सुकर होऊन जाईल. हा सामना जिंकला तर टीम इंडियाचे दोन सामन्यांत चार गुण होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -