Thursday, July 31, 2025
HomeयोजनानोकरीSBI CBO Recruitment 2022 : सुवर्णसंधी! SBI मध्ये CBO च्या 1,422 पदांसाठी...

SBI CBO Recruitment 2022 : सुवर्णसंधी! SBI मध्ये CBO च्या 1,422 पदांसाठी बंपर भरती, उमेदवारांनी तात्काळ करा अर्ज!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची त्यांच्याकडे सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसरच्या (CBO) पदांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. सीबीओच्या एकूण 1,422 पदांची बंपर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in किंवा sbi.co.in/careers ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.



एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, CBO च्या एकूण 1,422 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी 1400 नियमित रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहेत. तर 22 अनुशेष रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 18 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे. तर 7 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायाची असेल तर त्यांनी अधिकृत अधिसूचना वाचावी.

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाल्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2022
– ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख – 7 नोव्हेंबर 2022
– परीक्षेचे प्रवेशपत्र – नोव्हेंबर/डिसेंबर 2022
– परीक्षेची तात्पुरती तारीख – 4 डिसेंबर 2022

SBI CBO Recruitment 2022: रिक्त पदांचा तपशील ( याठिकाणी होणार भरती) –
– एकूण जागा – 1,422
– ईशान्य – 300 जागा
– भुवनेश्वर – 175 जागा
– भोपाळ – 183
– हैदराबाद – 176
– पश्चिम बंगाल – 175
– महाराष्ट्र – 212
– जयपूर – 201

SBI CBO Recruitment 2022: शैक्षणिक पात्रता –
एसबीआयने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, सीबीओच्या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.

SBI CBO Recruitment 2022: वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -