Tuesday, August 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; श्रीदत्त दालमिया साखर कारखान्याची पहिली उचल विनाकपात ३१०० रु जाहीर

कोल्हापूर ; श्रीदत्त दालमिया साखर कारखान्याची पहिली उचल विनाकपात ३१०० रु जाहीर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पोर्ले ता पन्हाळा येथील श्री दत्त दालमिया साखर कारखान्याची पहिली उचल विना कपात ३१००रु जाहीर केल्याची माहिती कारखाना युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी दिली.
कारखान्याने सन २०२२/२३सालाची शासनाच्या नियमानुसार एफ आर पी प्रमाणे बुधवारी ३०७५रु पहिली उचल जाहीर करण्यात आली होती.पण हि पहिली उचल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नसल्याने कारखाना सुरू करु नये असे आवाहन केले होते.संघटनेची ३१५०रु मागणी होती. हि मागणी मान्य केल्या शिवाय कारखाना सुरू करु नये असी भुमिका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती.



त्यानंतर कारखान्याने युनिट हेड एस रंगाप्रसाद, मुख्य शेती अधिकारी श्रीधर गोसावी असिस्टंट शेती अधिकारी संग्राम पाटील व शिवप्रसाद देसाई तसेच माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत शेतकरी संघटनेचे रामराव चेचर, विक्रम पाटील उमेश शेलार नारायण पाटील युवराज बेलेकर जोतीराम शेळके दगडू गूरवळ यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये प्रदिर्घ चर्चा होवून ३१००रु पहिली उचल विना कपात देण्याचे कारखाना प्रशासनाने मान्य करून जाहीर करण्यात आले.तसेच शासनाच्या धोरणानुसार चालू वर्षीच्या अंतिम साखर उतारा प्रमाणे होणारी एफ आर पी ची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -