Tuesday, August 5, 2025
Homeयोजनानोकरीजीडी कॉन्स्टेबलच्या 24,369 पदांसाठी बंपर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार!

जीडी कॉन्स्टेबलच्या 24,369 पदांसाठी बंपर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीने जीडी कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसएससीची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2022 पासून सुरु झाली असून 30 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

SSC GD Constable Notification 2022: महत्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु – 27 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2022
संगणक आधारित परीक्षेची तारीख – जानेवारी 2023

SSC GD Constable Notification 2022: पदांचा तपशील –
एकूण पदं – 24,369 पदं
सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) – 10497 पदं
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआईएसएफ) – 100 पदं
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) – 8911 पदं
सशस्त्र सीमा बल (एसएसबी) – 1284 पदं
इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आईटीबीपी) – 1613 पदं
आसाम रायफल्स (एआर) – 1697 पदं
सचिवालय सुरक्षा दल (एसएसएफ) – 103 पदं
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) – 164 पदं

SSC GD Constable Notification 2022: निवड प्रक्रिया –
– या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.
– या भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.
– परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य ज्ञान आणि जागरूकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी/हिंदी या विषयातील 80 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि एकूण 160 गुण असतील.
– परीक्षेसाठी एकूण 60 मिनिटांचा म्हणजेच एक तासाचा कालावधी दिला जाईल.
– परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये असेल.

SSC GD Constable Notification 2022: वयोमर्यादा –
– एसएससी जीडी कॉन्स्टेबल या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
– राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
– ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

SSC GD Constable Notification 2022: शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना वाचावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -