ताजी बातमी ऑनलाईन टीम
अखिल भारतीय नाथपंथीय समाज महासंघ कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी (दि. 30) पाचगाव (ता. करवीर) येथील ढेरे मल्टी पर्पज हॉलमध्ये महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, बेळगाव आदी जिह्यातील समाजबांधव मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. ही माहिती अखिल भारतीय नाथपंथी समाज कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष शिवराम उवरी आणि सचिव बळवंत डवरी यांनी दिली.
या महामेळाव्यात रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत दोन सत्रात विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळच्या सत्रात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. तसेच या महामेळाव्यास स्वराज्य संघटनचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुत्रीफ, काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार स्तुराज पाटील कळंबा कारागृहाच्या अधिकारी सौ. मीरा बाबर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता समाजाचे महासचिव विश्वनाथ नाथ, प्रदेशाध्यक्ष दिंगबर डवरी (पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्य कार्यकारणी सदस्य माजी नगरसेवक महेश जाधव, कोंडीबा डवरी, अशोक डवरी, मोहन डवरी, मुरलीधर जगताप, भरत वडगावकर, सोलापूरचे संजय चव्हाण प्रा सुरेश जाधव श्री. डी. बी. इंगळे (अकोला), सोमनाथ डवरी सांगली प्रकाश अहिरेकर औरंगाबाद, उदय पाटील कणकवली, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रविकांत बुवा, बेळगाव समाज जिल्हा अध्यक्ष रविकांत अमर बुवा. तुकाराम साळोखे, बेळगाव, सांगली जिल्हा अध्यक्ष शांतीनाथ जाधव आदी राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.
मेळाव्यात कृष्णात डवरी प्रास्ताविक तर शिवराम डवरी, आणि केरबा डवरी समाजप्रबोधन करणार आहेत शासकीय सेवेत कार्यरत वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक समाजबांधव यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात भव्य मोफत वधुवर परिचय मेळावा आयोजित केला गेला आहे. संयोजन कोल्हापूर जिल्हयातील सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व तालुक्यातील कार्यकारिणी, महिला कार्यकारणी, युवा आघाडी संपूर्ण समाज बांधव करीत आहेत हा मेळावा नाथपंथीय समाजात एक खास दिशा देणारा समाजप्रबोधन करणारा ठरणार आहे, असा विश्वास सेवानिवृत गटशिक्षण अधिकारी अध्यक्ष शिवराम डवरी यानी व्यक्त केला.