ताजी बातमी ऑनलाईन टीम
पिंपरी-चिंचवड शहरात पतीने पत्नीच्या मित्राला दहाव्या मजल्यावरून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश अशोक जोर्वेकर असे खून झालेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
पंकज याला आपल्या पत्नीवर संशय होता. तो सतत पत्नीवर लक्ष ठेवायचा. त्याने पत्नीला तो दोन दिवसांसाठी कामासाठी गावी जात असल्याचे सांगितले. यानंतर पत्नीने आपल्या मित्राला घरी बोलावले. पत्नी आणि तिचा मित्र हे दोघं घरात होते. याच वेळी अचानक पंकज याने घरावर धाड टाकली. ठरवलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच तो घरी हजर झाला होता. तो घरात आला तेव्हा त्याला त्याची पत्नी ही मित्रासोबत दिसली. यानंतर त्याला मोठा धक्का बसला. त्याने संतापून असे पाऊल उचलले की, पत्नीच्या मित्राला जीव गमवावा लागला.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दरम्यान तो मी दोन दिवसांसाठी गावी जात आहे, हे पत्नीला सांगून तो घरातून निघून गेला. यानंतर पत्नीचा मित्र निलेश अशोक जोर्वेकर हा पंकजच्या पत्नीकडे पोहोचला. पंकजची पत्नी आणि मयत नीलेश हे खूप जवळचे मित्र होते. पंकज बायकोवर लक्ष ठेवून होता. म्हणून तो दोन ऐवजी एकाच दिवसात गावावरुन परत आला. यावेळी तो घरी आला असता त्याला घरात पत्नी ही मित्रासोबत दिसली. या घटनेनंतर मित्र निलेश आणि पती पंकज यांच्यात पत्नीसमोर जोरदार वाद झाला. या रागातून पंकजने नीलेशला घराच्या दहाव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली ढकलले. यामध्ये निलेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकजला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.