ताजी बातमी ऑनलाईन टीम
कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांना कारने चिरडले आहे. या अपघातात आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पायी दिंडीतच भरधाव कार घुसली आणि कारने वारकऱ्यांना चिरडले. या घटनेत सहा वारकरी जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सांगोला तालुकयातील जुनोनी या गावाजवळ ही घटना घडली. हे सर्व वारकरी कोल्हापुरातील होते अशी माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
दिंडीत एकूण 32 जण
विठ्ठलाचे नामस्मरण करत ही दिंडी पायी पंढरपूरकडे रवाना झालेली होती. कोल्हापूर जिलह्यातील जठारवाडी या गावातील रहिवासी या दिंडीमध्ये होते. एकूण 32 जण या दिंडीमध्ये होती अशी माहिती आहे. त्यापैकी 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर सहा जण हे जखमी आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तसेच चिमुकल्या मुलाला देखील यामध्ये जीव गमावावा लागला आहे.
ही दिंडी कोल्हापुरातून निघाली होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी जवळील बायपास रस्त्याजवळ आली होती. याच वेळी मिरजकडून भरधाव वेगात एक कार आली. ही कार थेड दिंडीमध्ये घुसली आणि एकामागून एक वारकऱ्यांना चिरडत गेली. यामध्ये आठ वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर सहा जण हे जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताल पोलिस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर कार चालक हा सांगोला तालुक्यातीलच असल्याची माहिती आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पायी दिंडीत घुसली कार, कोल्हापुरातील 8 वारकऱ्यांचा सांगोल्यात मृत्यू!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -