Tuesday, August 5, 2025
Homeतंत्रज्ञानव्हॉट्अपनंतर इंस्टाग्राम झाले होते डाऊन, अकाउंट्स सस्पेंड होत असल्याच्या तक्रारी; काही तासात...

व्हॉट्अपनंतर इंस्टाग्राम झाले होते डाऊन, अकाउंट्स सस्पेंड होत असल्याच्या तक्रारी; काही तासात सेवा पूर्ववत!



गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक तास व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होते, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता अशीच समस्या इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग अ‍ॅपवर समोर आली आहे. लोकांनी दावा केला आहे की, लॉगइन केल्यावर अकाउंट सस्पेंड होण्याचे नोटिफिकेशन येत आहे. सोशल मीडियावर बरेच लोक स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. तर इंस्टाग्राम खरोखर लोकांची खाती निलंबित करत आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान यावर इंस्टाग्रामने अधिकृत निवेदन जारी केले होते. आम्ही यामध्ये सुधारणा करत आहोत असे ते म्हणाले होते. यानंतर आता इंस्टाग्रामची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

इंस्टाग्रामने पूर्ववत केली सेवा
इंस्टाग्रामवरील सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. याविषयी निवेदन जारी करत इंस्टाग्रामने म्हटले की, ‘आम्ही आता या बगचे निराकरण केले आहे. या समस्येमुळे जगाच्या विविध भागांतील लोकांना त्यांच्या अकाउंटमध्ये लॉगइन करण्यात समस्या येत होत्या आणि काही फॉलोअर्सच्या संख्येत तात्पुरता बदल झाला होता.’ याविषयी इंस्टाग्रामने माफी देखील मागितली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -