नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय वायुसेनेत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जानेवारी 2023 च्या बॅचसाठी ही भरती केली जाणार आहे.
भारतीय हवाई दलात होणाऱ्या या भरतीसाठी 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठीची अर्जप्रक्रिया 07 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबरपर्यंत असून, 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या उमेदवारांना चार वर्षे हवाई दलात सेवेची संधी मिळणार आहे. या सेवेनंतर उमेदवारांना मोठी रक्कम मिळेल, शिवाय अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. अग्निवीरांना दरवर्षी सेवेदरम्यान 30 दिवसांची रजाही दिली जाईल. शिवाय वैद्यकीय सल्ल्यानुसार आजारी रजाही मिळणार आहे.
भरतीसाठीचे निकष
बारावीत गणित, भौतिकशास्त्र व इंग्रजीत किमान 50 टक्के मिळालेले असावेत.
इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यांना 50 टक्के गुण मिळालेले असावेत.
फिजिक्स व मॅथ्ससह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येतील.
अग्निवीरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उंची किमान 152.5 सेमी असावी.
असा करा अर्ज…
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in
ला भेट द्या.
होमपेजवर Apply Online वर क्लिक करा.
नंतर उमेदवारांना प्रथम ‘साइन इन’ करावे लागेल.
साइन अप केल्यानंतर लॉगिन व पासवर्ड मिळेल.
लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.
शेवटी अर्जाची 250 रुपे फी भरून फॉर्म सबमिट करा. ही फी उमेदवारांना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे.