टी-20 विश्वचषकातील अनेक रंगतदार लढतीनंतर आता भारतीय संघाचा चौथा सामना आज बांग्लादेशविरुद्ध (Ind vs Ban) होणार आहे. मागील तीन सामन्यात भारताचा फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला आहे. आता सेमी फायनलमध्ये धडक मारण्यासाठी पुढील सगळे सामने भारताला जिंकावे लागणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात आज (ता. 2 नोव्हेंबर) होणारा भारत विरुद्ध बांग्लादेश सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहायला मिळणार आहे.
भारत संभाव्य संघ: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हर्षल पटेल.
बांगलादेश संभाव्य संघ: नजमुल हुसेन शांतो, सौम्य सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मोसाद्देक हुसेन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, नसूम अहमद, इबादोत हुसेन.
यंदाच्या विश्वचषकात युवा खेळाडूंना टीम इंडियाने सर्वाधिक संधी दिली आहे. आता आगामी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीआयने सोमवारी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी रवींद्र जडेजा दुखापतीतून बरा झाल्याने तो आणि आयपीएल गाजवणारे गोलंदाज यश दयाल व कुलदीप सेनला संधी मिळणार असल्याची माहीती आहे.