Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूर…कोल्हापुरात तांडव होईल; नितेश राणेंचा इशारा

…कोल्हापुरात तांडव होईल; नितेश राणेंचा इशारा

गेल्या काही दिवसापासून आमच्या कोल्हापुरात लव्ह जिहाद आणि धर्मातर प्रकरण समोर येत आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल होत असून देखील पोलीस तपास करत नाहीत.15 दिवस होवून देखील काही केले जात नाही.काही मोजके अधिकारी हे उडवा उडावीची उत्तर देत आहेत. महाराष्ट्रात धर्मातर विरोधी कायदा नसल्यामुळे पोलीस उडवाउडवीची उत्तर देत आहेत. म्हणूनच हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणावा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच हिंदू मुलीकडे पाहाल तर याद राखा, असा इशाराही त्यांनी दिला.कथित लव्ह जिहाद प्रकरणी आज कोल्हापुरात आंदोलन छेडले यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही टिका केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात धर्मातराच्या घटना वाढल्या आहेत.आम्ही काही दिवसांपूर्वी फोन केला मग पोक्सो कायदा लावला.आई- वडील आणि इतरांना तुम्हाला काय करायचे ते करा अस इथले अधिकारी बोलत आहेत. काही जिहादी तरुण प्रेम प्रकरण करतात,त्यानंतर लग्न करतात. त्यानंतर तीच धर्मातर केले जाते.अनेक मुली गायब होतात.त्यानंतर त्या सौदी आणि अरब देशात असतात.पोलीस अधिकारी जो पर्यत जिहादी मुलांना शिक्षा देत नाहीत तो पर्यत हे थांबणार नाही.महाराष्ट्रात मुलींना पळवून नेण्यासाठी रेट कार्ड लागले आहेत.

मुलींना फसविण्यासाठी मुस्लिम तरुणांना पैसे आणि मोटारबाईक दिले जातात.मी अनेक मुस्लिम धर्मगुरूना अवाहन केले आहे,तुम्ही तुमच्या मुलांना आवरा म्हणून.. अन्यथा आमचा संयम सुटेल. असच सुरू राहिल तर आम्ही कायद्याचा विचार करणार नाही. तुम्ही आमच्या मुलींना टार्गेट करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही.आम्ही आवाहन देत बसणार नाही.आम्ही धर्म रोखण्यासाठी शत्र उचलण्याची मुभा दिली आहे. तुमचे डोळे कसे काढून ठेवायचे हे आम्हाला माहिती आहे. मुलगी परत आल्यानंतर तीच भविष्य आम्ही घडवू असेही ते म्हणाले.

पुढे बोलतान ते म्हणाले, एक कडवट हिंदुत्ववादी व्यक्ती आज गृहमंत्री म्हणून बसला आहे.दिलेली जबाबदारी पूर्ण करा,अन्यथा मंत्रालयात बसलेला व्यक्ती गप्प बसणार नाही,असा इशारा पोलिसांना दिला. पुण्यात एक घटना घडली आहे.एका हिंदू महिलेवर 40 लोक चालून गेलेत.त्याच्याकडे आम्ही जाणार आहोत.बाकी सगळे प्रश्न नंतर.अनेक पोलीसाना वाटतय आजही महाविकास आघाडीचे सरकार आहे.महाराष्ट्रात धर्मातर विरोधी कायदा नसल्यामुळे पोलीस उडवाउडवीची उत्तर देतात.येणाऱ्या अधिवेशनात तसा कायदा आणावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही राणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -