Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यHealth Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ, आरोग्याला होऊ शकते...

Health Tips: दह्यासोबत चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ, आरोग्याला होऊ शकते नुकसान!

दह्यामध्ये (curd) असलेले प्रोबायोटिक बॅक्टेरिया पोटासाठी वरदान आहेत. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. अपचनापासून ते कोणत्याही बॅक्टेरियाचा संसर्स दूर करण्यासाठी दही हे औषधाचे काम करते. दही केवळ टेस्टसाठीच नाही तर पचनशक्ती वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. काहीवेळा दह्यामध्ये काही पदार्थ मिसळून ते अधिक चविष्ट केले जाते. परंतु ते शरीरात विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत होते. याशिवाय इतरही अनेक घातक परिणाम होऊ शकतात. कोणत्या पदार्थांसोबत दही खाल्ल्याने नुकसान होते हे आपण आज जाणून घेणार आहोत.

उडदाची डाळ
उडदाची डाळ दह्यासोबत अजिबात खाऊ नये, दोन्ही एकाच वेळी खाल्ल्याने शरीराला खूप नुकसान होते. ज्यामुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. दोन्ही एकत्र खाल्ल्याने नुकसान होते.

दूध आणि दही
दूध आणि दही एकत्र सेवन करू नये. असे केल्याने अ‍ॅसिडिटी, गॅस आणि उलटीची समस्या सुरू होते. तसेच, पचनाचा त्रास होऊ शकतो.

दह्यासोबत कांदा खाणे हानिकारक आहे
दह्यात कांदा खाल्ल्याने तुम्हाला रायत्याची खूप चव छान लागत असेल. पण ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने नुकसान होते. दही आणि कांद्याचा गुणधर्म हा विपरीत आहे. दही थंड आणि कांदा हा उष्ण असतो. यामुळे खरुज, खाज, एक्जिमा, सोरायसिस, त्वचा आणि पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

दही आणि साखर
दह्यासोबत साखर मिसळून खाऊ नये. दही आणि साखर एकाच वेळी खाल्ल्याने पचनक्रिया खराब होते. दही आणि साखर खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. दह्यासोबत गोड घायचेच असेल तर तुम्ही गुळ खाऊ शकता. मात्र ते देखील कमी प्रमाणातच खावे. दह्यात मीठ मिसळून खाता येऊ शकते.

आंबा आणि दही
आंबा आणि दह्याची रस्सी किंवा स्मूदी चवीला खूप छान लागते. मात्र हे आरोग्यासाठी घातक असते. हे चुकूनही एकाच वेळी घाऊ नये. दोन्ही शरीरात विष निर्माण करतात. कारण याची ताशीर खूप वेगवेगळी असते. हे डायजेशनमध्ये अडथळा निर्माण करते. लठ्ठपणा आणि डायबिटीज देखील वाढवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -