Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात डिव्हायडरला धडकून कारचा अपघात, १ ठार

कोल्हापूर : ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात डिव्हायडरला धडकून कारचा अपघात, १ ठार

समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात अर्टिगा कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याने कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेखा मनोजकुमार केशरवाणी (वय ३६) असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेशची असून सध्या ती इंचलकरंजी येथे राहत होती. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, इचलकरंजीहून कागल पंचतारांकित एमआयडीसीमार्गे लक्ष्मी टेकडीकडे अर्टिगा कारमधून मनोजकुमार लल्लनलाल केशरवाणी व रेखा मनोजकुमार केशरवाणी हे दोघे पती-पत्नी जात होते. यावेळी महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात मनोजकुमार यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याकडेला असलेल्या डिव्हायडरला धडकून कार पलटी झाली. यावेळी कारमध्ये शेजारीच बसलेल्या रेखा केशरवाणी ही महिला गंभीर जखमी झाली व तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेचा पती मनोजकुमार केशरवाणी यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -